Posts

ईसार पावती म्हणजे काय ?      प्रॉपर्टीचा व्यवहार म्हणजे जरा क्लिष्टच असतो. कित्तीतरी औपचारिक बाबींची पूर्तता करावी लागते. एक जरी पायरी चुकली किंवा राहिली तर ते व्यवहार अधिकृतरित्या पूर्ण होत नाही. एकतर मालमत्ता व्यवहाराच्या गोष्टी महागड्या व सोबत वेळखाऊदेखील असतात असा परिस्थितीत काम चांगल्याप्रकारे फत्ते व्हावे असाच आपला मानस असतो. यांत कागदपत्रे-पावती यांनादेखील महत्व असणारच तर पाहूया ‘ईसार पावती म्हणजे काय’ या पावतीचे जागेच्या व्यवहारामध्ये काय महत्व आहे , ही पावती कधी काढली जाते. स्थावर मालमत्तेची खरेदी-विक्री लगेलग तडकाफडकी होत नाही , तसं होऊ पण नाही. समजा तुम्ही एखादी जागा घेण्याच्या विचारात आहात , तुम्ही त्याची जाहिरात वाचली किंवा कुणाकडून तर त्याबद्दल माहिती मिळाली. जागा पाहिल्यानंतर सर्व रीतीने ती जागा तुम्हांला व तुमच्या आप्तजनांना अनुरूप वाटली. जागेचे स्थान , दर , जमिनीचा पोत तसेच व्यावहारिक पारदर्शकता या सगळ्या अंगांनी ती जागा खरेदी करण्यासाठी पसंत पडली तर तुम्ही म्हणजे खरेदी करणारा व विक्रेता यांच्यामध्ये एक करार होतो , त्यांत दोन्ही पक्षांकडून होणाऱ्या ...